NSE Scam : आनंद सुब्रम्हण्यम यांना चेन्नईतून सीबीआयकडून अटक, शेअर बाजाराशी संबंधित गुन्हा

NSE Scam :  नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि एनसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. आनंद सुब्रम्हण्यम यांच्यावर अनेक आरोप आहेत.  सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती. चित्रा रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016  या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता.  


  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola