Amit Shah Exclusive on Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार

Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये (Gujarat) सध्या ज्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, ते पाहून भाजपच्याच (BJP) बाजूने लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व पाहून आम्ही आमच्याच पक्षाचे पूर्वीचे विक्रम मोडून पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांची एबीपी अस्मिताने खास मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे. परंतु, अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला 131 ते 139 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यावर बोलताना अमित शाह यांनी सांगितले की, गुजरातच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये,  शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषत: गुजरातच्या महिलांमध्ये विश्वासाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हे पाहता आम्ही निश्चितपणे आमचे सर्व विक्रम मोडीत काढू आणि बहुमताने सरकार स्थापन करू. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola