Namastey Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर | ABP Majha

भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता डोनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते 22 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत आणि मोटेरा क्रिकेट स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात मोदींसोबत जनसभेला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. याचसोबत डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमलाही भेट देणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola