Omicron : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, अलाहाबाद हायकोर्ट

Continues below advertisement

ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच उत्तर प्रदेशात मात्र कोरोना नियम पायदळी तुडवत तुफान गर्दीच्या जाहीर सभा पार पडतायत. यावरच अलाहाबाद हायकोर्टाने चिंता व्यक्त केलीय. निवडणूक प्रचारसभांवर बंदी घालण्यात यावी आणि शक्य असल्यास निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशा सूचना कोर्टाने पंतप्रधान मोदी तसंच निवडणूक आयोगाला दिल्यात. जाहीर सभांमध्ये कोविड नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका पाहता असे राजकीय कार्यक्रम रुग्णवाढीला आमंत्रण देऊ शकतात याकडं कोर्टानं लक्ष वेधलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram