कुटुंबातील कुणालाही तिकीट न देण्याचा Akhilesh Yadava यांना फटका, मुलायम सिंह यांची सून भाजपमध्ये

Continues below advertisement

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना मोठा धक्का बसलाय. मुलायम सिंह यांच्या धाकट्या सूनबाईंनी अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अपर्णा यादव यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं. अपर्णा यादव यांना यावेळीही निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं होतं. पण अखिलेश यादव यांनी कुटुंबातील कोणालाही उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच अपर्णा यादव यांनी पक्ष सोडण्याचं संकेत याआधीच दिले होते. विशेष म्हणजे स्वतः मुलायम सिंह यादव यांनीही अपर्णा यांना तिकीट द्यावं असे अखिलेश यादव यांना सांगितलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram