Ajit Pawar on Chandrayaan 3 : चांद्रयान 3 चं लँडिंग यशस्वी, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने आज सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर लँडिंग केले. इस्रोच्या अथक परिश्रमानंतर भारताने अंतराळात इतिहास रचलाय. भारताच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतामध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे. गाव खेड्यापासून शहरापर्यंत भारत माता की जय असे नारे दिले जात आहेत. सोशल मीडियावरही शुभेच्छा दिल्या जात आहे. पण विक्रम लँडर चंद्रावर पोहच्यानंतर पुढे काय? चांद्रयान 3 चा पुढील टप्पा काय असेल ? विक्रम चंद्रावर कसे काम करेल... भारताला माहिती कशी पाठवली जाईल ? याची चर्चा सुरु आहे.