Ajit Pawar Full Speech : एनडीएच्या बैठकीतील अजित पवारांचं पहिलं भाषण : ABP Majha

NDA Parliamentary Party Meeting : भाजपच्या नेतृत्वातील एनडीएची (NDA Meeting) नवी दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये महत्वाची बैठक आहे.  एनडीएमधील पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. तसंच एनडीए खासदारांचीही आजच बैठक आहे.  पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडतील. त्याशिवाय नरेंद्र मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या  बैठकीला उपस्थित आहेत. महत्वाचं म्हणजे, या बैठकीवेळी अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे हेही मंचावर नितीश कुमार यांच्या शेजारी बसलेले दिसले. 

देवेंद्र फडणवीस हे एनडीएच्या नेत्यांसोबत स्ट्रेंटल हॉलमध्ये बसले होते. राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे अजित पवार यांना मंचावर बसण्याचा मान मिळाला. एकनाथ शिंदेही शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही मानाचे स्थान मिळाले. अजित पवार अमित शाह यांच्या शेजारी मंचावर बसले होते.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola