Air India Stops Credit Facility : मंत्र्यांच्या मोफत प्रवासाला 'टाटा',तिकीट काढूनच प्रवास करता येणार

Continues below advertisement

केंद्र सरकारची मंत्रालये आणि विभाग यापुढे एअर इंडियाकडून क्रेडिटवर विमान तिकीट खरेदी करू शकणार नाहीत. एअर इंडियाने सरकारची मंत्रालये आणि विभागांना क्रेडिटवर (नो क्रेडिट फॅसिलिटी) विमान तिकीट देणे बंद केले आहे. एअर इंडियाच्या या निर्णयानंतर अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना पुढील आदेशापर्यंत एअर इंडियाकडून क्रेडिटवर तिकीट खरेदी करू नये, असे निर्देश दिले आहेत. अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना एअर इंडियाची थकबाकी तातडीने भरण्याचे आदेश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram