Air India Plane Crash | विमान दुर्घटनेत कॅप्टन दिपक साठे यांनी गमावला जीव; कोण आहेत दिपक साठे?

Continues below advertisement
केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. या अपघातात आपला जीव गमावून कित्येक जीव वाचवणारे कॅप्टन दिपक साठे हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. कॅप्टन दिपक वसंत साठे हे एअर फोर्सचे टेस्ट पायलट होते. एअर फोर्सचे टेस्ट पायलट अनेक एयरक्राफ्टवर टेस्ट करत असतात.

या अपघात झालेल्या विमानाचे पायलट कॅप्टन दिपक वसंत साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार हे दोघे होते. कॅप्टन दिपक साठे हे फायटर पायलट होते. ते राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (NDA) चे माजी विद्यार्थी होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता. वायु सेना अकादमीकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त कॅप्टन दिपक साठे यांनी मिग विमानं सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही पायलट कॅप्टननी आपला जीव गमावत जवळपास 170 लोकांचा जीव वाचवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram