Air India Aircraft Accident : एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरून घसरलं, सुदैवाने मोठा अपघात टळला
Continues below advertisement
मध्य प्रदेशात एअर इंडियाचं विमान धावपट्टीवरून खाली घसरल्याची घटना घडली.. सुदैवाने वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.. काल जबलपूरच्या डुमना विमानतळावर ही घटना घडली. विमानतळावर उतरत असताना नियंत्रण सुटल्याने हे विमान धावपट्टीवरून खाली उतरलं. या विमानाचं चाक धावपट्टीच्या बाजूला असलेल्या मुरुमामध्ये फसलं होतं.. मोठ्या प्रमाणानंतर हे विमान धावपट्टीवर आणण्यात आलं. या विमानात 54 प्रवासी असल्याची माहिती मिळतीये.
Continues below advertisement