Air India Plane Crash | इमारतीची भींत फोडून विमान थेट कोसळलं, भयावह दृश्य आली समोर; मोठी जीवितहानी
Air India Plane Crash | इमारतीची भींत फोडून विमान थेट कोसळलं, भयावह दृश्य आली समोर; मोठी जीवितहानी
Air India Plane Crash मुंबई : अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान कोसळलं. एअर इंडियाची फ्लाईट एआय -171 दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. या विमान अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला यासंदर्भात सरकारी यंत्रणांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भीषण विमान अपघातात एक प्रवासी बचावला असल्याची माहिती आहे. विमानातील 11 अ या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिली आहे. या प्रवाशाचं नाव विश्वशकुमार रमेश असं आहे. त्याचा रुग्णवाहिकेकडे जात असतानाचा व्हिडिओ समोर आल आहे.
विमानातील एक प्रवासी बचावला
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना या संदर्भातील माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात 11 अ या सीटवरील प्रवासी बचावल्याची माहिती आहे. या बचावलेल्या प्रवासाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या विमान अपघातात किती जणांचा मृत्यू झाला हे सध्या सांगता येणर नाही, असं ते म्हणाले. विमान निवासी भागात क्रॅश झाल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असंही जीएस मलिक यांनी म्हटलं.