Agnipath Scheme Age : लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या किमान वयोमर्यादेत बदल
अग्निपथ योजनेतंर्गत लष्कर भरतीसाठीच्या वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. आधी ही वयोमर्यादा साडेसतरा ते २१ वर्षे इतकी होती. ती बदलून 23 वर्षे इतकी करण्यात आली आहे.. मात्र हा बदल फक्त या वर्षापुरताच लागू असेल.. पुढील वर्षापासून पुन्हा वयोमर्यादा ही साडेसतरा ते 21 वर्षे इतकी असेल. कोरोनामुळं गेले दोन वर्षे लष्करभरती रखडलीय. तसंच कालपासून देशभरात अग्निपथ योजनेविरोधात तीव्र आंदोलनं सुरु आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्र सरकारनं वयोमर्यादेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय.