Agneepath scheme Protest : देशभरात अग्निपथ योजनेवरून हिंसेचं सत्र सुरू, बिहारमध्ये आज बंदची हाक

देशभरात अग्निपथ योजनेवरून हिंसेचं सत्र सुरूच आहे. उत्तरेतील अनेक राज्य आणि तेलंगणामध्ये या योजनेविरोधात तरुण रस्त्यावर उतरले. बिहारमध्ये आज बंदची हाक देण्यात आलीय. बिहारमध्ये आंदोलनाचं लोण तीव्र असल्यानं तिथल्या १२ जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज वायुसेना आणि नौकासेना आणि डीएमएच्या अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर देशभरातील सुरू असलेल्या हिंसा आणि अग्निपथ योजनेवर काही तोडगा निघणार का हे पहावं लागेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola