Pakistan Vs Afghanistan : तालिबानी हल्ल्यात पाकिस्तानचे पाच सैनिक ठार, पाक-अफगाणिस्तान सीमेजवळील घटना
abp majha web team
Updated at:
21 Oct 2021 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतालिबानला मदत करणाऱ्या पाकिस्तानलाच आता तालिबानी दहशतवाद्यांनी धक्का दिला आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये झालेल्या दोन वेगळ्या हल्ल्यांमध्ये कमीत कमी पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळील मामुंडमध्ये रस्त्यावर सुरक्षा दलाचं एक वाहन बॉम्बस्फोटात सापडलं असून यात चार पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला तर उत्तर वझीरिस्तानातील छपरी वजीरन चेक पोस्ट वर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच तालिबान प्रमुख नूर वली महसूद यांनी व्हीडियो मेसेजमध्ये पाकिस्तानला इशारा दिला होता.