Aditya Thackeray Ayodhya Daura : शरयू काठावर महाआरतीची जय्यत तयारी : शिवसेना : ABP Majha
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हजारो शिवसैनिकांसह कालच अयोध्येत दाखल झालेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीची जोरदार तयारी शिवसेनेनं केलीय.