Aditya-L1 : सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' सज्ज , यानाचं 2 सप्टेंबरला प्रक्षेपण
चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानतंर आता इस्रोनं सूर्याचा अभ्यास करण्याची अवघड मोहीम हाती घेतलीय. इस्त्रोचे 'आदित्य एल-1' हे यान 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोन थराची सद्यस्थिती, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम अशा अनेक गोष्टींचा अभ्यास सौरमोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एल-1 हा सूर्य आणि पृथ्वीमधील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत इस्रोचे अवकाशयान जाणार आहे.