Irrfan Khan | इरफान खान यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रही हळहळलं, दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली

Continues below advertisement
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. परंतु काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूशी झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील त्यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram