Corona Mask : देशातील 50 टक्के लोक मास्क वापरत नाहीत, धक्कादायक सर्व्हे, केंद्राची माहिती

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. मात्र अजूनही देशभरात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र देशातील 50 टक्के लोक अजूनही मास्क वापरत नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 

 

एका सर्वेक्षणाच्या आधारे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकट गंभीर असताना देखील 50 टक्के लोक मास्कचा वापर करत नाहियेत. तसेच जे लोक मास्क वापरतात त्यापैकी 64 टक्के लोक मास्कद्वारे नीट नाक झाकत नाहीयेत. 

 

आरोग्य मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 25 शहरांमध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे ही माहिती समोर आली आहे. 20 टक्के लोक आपला मास्क तोंडाच्या खाली ठेवतात. तर 2 टक्के लोक मास्क मानेवर अडकवून ठेवतात. तसेच 50 टक्के मास्क वापरणाऱ्या लोकांपैकी फक्त 14 टक्के लोक असे आहेत की जे योग्यरित्या मास्क वापरत आहेत. 

 

डबल मास्क फायदेशीर

 

डबल मास्क वापरणे सुरक्षित असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (CDC) ने याबाबत परीक्षण केलं होतं, यामध्ये अशी माहिती मिळाली की डबल मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव 95 टक्के रोखला जाऊ शकतो.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram