Haryana Dangal : हरियाणातील नूहमध्ये सोमवारी उसळली होती दंगल, घटनेनंतर नूहमध्ये संचारबंदी
हरियाणातील नूहमध्ये काल दंगल उसळळी. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी संचलन केलंय. कालच्या हिंसाचाराच्या आगडोंबात नूह धगधगतंय. इथं काल अनेक गाड्या जाळण्यात आल्या, घरं उद्ध्वस्त करण्यात आली. अगदी पोलिसांच्या गाड्याही फोडण्यात आल्या. ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रेसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते नलहद शिवमंदिरात मेवादमध्ये जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही दंगल झाली. या घटनेनंतर तिथं संचारबंदी लागू करण्यात आली असून एक हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आलेत.