2000 RS in Reserve Bank : 2 हजाराच्या 88 टक्के नोटा जमा, 42 हजार कोटींच्या नोटा अजूनही जमा नाहीत

Continues below advertisement

चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३१ जुलै २०२३ पर्यंत बँकांकडे ८८ टक्के नोटा जमा झाल्या. मात्र, अजूनही सुमारे ४२ हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आलेल्या नाहीत अशी माहिती रिझर्व बँकेने दिलीये. चलनात असलेल्या ३.६२ लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी बँकिंग प्रणालीमध्ये ३.१४ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा जमा झाल्या आहेत, अशीही माहिती रिझर्व्ह बँकेने दिलीये. नोटा चलनातून बंद केल्यानंत वेळ दिला होता. मात्र, त्या जमा न केल्याने रिझर्व बँकेकडून आता, नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram