Morbi bridge collapse :साखरपुड्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील 6 जणांचा मोरबी दुर्घटनेत मृत्यू
Morbi bridge collapse : मोरबीत झुलता पूल कोसळल्यानंतर गल्लीबोळात शोकांतिकांची मालिका पाहायलामिळतेय. त्यातलीच एक गोष्ट आहे सोर्डी भागातील. जिथं एकाच घरातले सहा लोकदगावले आहेत. मोहम्मद मीर यांच्या लेकीचा साखरपुडा होणार होता, त्यासाठी सगळेपाहुणे गावोगावहून मोरबीत आले होते. घरातील पुरुष खरेदीला गेल्यानंतर महिला आणि लहान मुलं झुलता पूल बघायला गेली, त्यातले सहा जण परत आलेच नाहीत. कालपर्यंत साखरपुड्यासाठी रंगबेरंगी मंडप टाकलेल्या घरासमोर आज शुभ्र रंगांचा मंडप टाकून शोक करण्याची वेळ आलीय.