एप्रिल महिन्यात कोरोनामुळे 52 पत्रकारांचा मृत्यू,तर एप्रिल 2020 ते 2021 या काळात 101 पत्रकारांचा बळी

Continues below advertisement

मुंबई :  रोहित सरदाना यांच्या मृत्यूमुळे अख्खं पत्रकारितेचं विश्व हादरुन गेलं असतानाच एकट्या एप्रिल महिन्यात देशभरात तब्बल 52 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. म्हणजे गेल्या 28 दिवसात दिवसाला जवळपास दोन पत्रकारांचा देशात कोरोनानं बळी घेतलाय.

दिल्लीच्या परसेप्शन स्टडीज संस्थेनं केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान एका वर्षाची आकडेवारी पाहिली तर एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या काळात जवळपास 101 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय कोरोनानंतर शरीरात झालेल्या गुंतागुंतीमुळे इतर 50 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram