एप्रिल 2022 पासून 15 वर्ष जुनी सरकारी वाहनं भंगारात,स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे 50,000 नोकऱ्यांची निर्मिती
नवी दिल्ली : सरकारी विभागाच्या 15 वर्षापेक्षा जुन्या गाड्यांचे 1 एप्रिल 2022 पासून रजिस्ट्रेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याकडून या प्रस्तावाला अंतिम रूप दिलं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या व्हेइकल स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचं पहायला मिळतंय.