127 Amendment Bill : लोकसभेत 127 वं घटना दुरुस्ती विधेयक बहुमतानं मंजूर ABP Majha

नवी दिल्ली : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मतं पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झालं आहे. उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे.  


लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं यावर आज चर्चा झाली. या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola