Cheetah :आणखी 12 चित्ते भारतात येण्याच्या प्रतिक्षेत, शिकार न केल्यानं चित्त्याचं वजन वाढण्याची भीती

Continues below advertisement

नामिबियातून काही महिन्यांआधी भारतात आणलेले आठ चित्ते आता वातावरणाशी जुळवून घेत आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आणखी १२ चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले जाण्याची प्रतीक्षा आहे. यांच्या स्थलांतराविषयीचा सामंजस्य करार झाला नसल्यानं त्यांचं स्थलांतर रखडल्याची माहिती आहे.  सुमारे चार महिन्यांपासून विलगीकणात असल्याने चित्त्यांच्या तंदुरुस्तीवरही परिणाम होऊ लागलाय..या चित्त्यांमध्ये ७ नर आणि ५ मादी चित्त्यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांत या चित्यांनी शिकारही केली नसल्यानं त्यांच्या क्षमतेवरही परिणाम झालाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram