लसीकरणाचा 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण, भारताची विक्रमी कामगिरी, केंद्र सरकारकडून सेलिब्रेशन

नवी दिल्ली : भारत विक्रमी कारगिरीच्या उंबरठ्यावर असून 100 कोटी डोसचा टप्पा अवघ्या काही तासातच पूर्ण होणार आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असून याच्या सेलिब्रेशनसाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी सुरु केली आहे. 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर याची घोषणा सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जल्लोशात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 

देशात आत्तापर्यंत 99 कोटी 85 लाख 55 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. हाच वेग कायम राहिल्यास 100 कोटी डोसचा टप्पा अवघ्या काही तासातच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने मेगा प्लॅन तयार केला आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीला रोषणाई करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola