Mumbai Potholes | खड्डे आणि वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण,दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही खड्डे तसेच!
Continues below advertisement
मुंबईकरांच एकीकडे कोरोना व्हायरसने कंबरडं मोडलं आहे तर दुसरीकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांनी. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाची सतत संततधार सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी दरवसशी प्रशासन लाखों रूपये खर्च करत. परंतु तरीदेखील परिस्थिती जैसे थे असल्याचं पाहायला मिळते. यंदा देखील परिस्थिती अशीच आहे. मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर अशाच प्रकारचे खड्डे पडले असल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्या कोरोनाच्या भीतीने अनेकजण आपल्या स्वतःचं गाडीने ऑफिसला जाणं पसंद करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड गाड्या असल्याचं चित्र आहे. एकीकडे मोठया प्रमाणात खड्डे आणि दुसरीकडे वाहतूक समस्या यामुळे नागरिक प्रचंड वैतागले असल्याचं दिसतं. त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय निदान यंदा तरी यावर कायम स्वरूपी काहीतरी तोडगा निघेल.
Continues below advertisement