Online Learning | शालेय शिक्षण विभागामार्फत Jio TVवरील तीन चॅनेल, JioSaavnच्या रेडिओ चॅनेलचं उद्घाटन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचविणे शक्य होईल यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. असे असताना विविध पर्यायाचा अवलंब शिक्षण विभाग करताना पाहायला मिळतंय. याचाच एक भाग म्हणून जिओ टीव्ही प्लॅटफॉर्म वर इयत्ता 12 वी सायन्स, इयत्ता 10 वी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी जिओ ज्ञानगंगा हे तीन चॅनेल आजपासून सुरू करण्यात आले असून जिओ सावन हे रेडिओ चॅनेलवर 'आम्ही इंग्रजी शिकतो' (we learn english) या कार्यक्रमाचा सुद्धा आज उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थित व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात आले.