CM Thackeray | कोरोना, दिवाळी आणि मंदिरांबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले? पाहा महत्त्वाचे मुद्दे
Continues below advertisement
मुंबई : आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये काळजी घेणं गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, असं ठाकरे म्हणाले. आज त्यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं.
Continues below advertisement