Monsoon Update देशात जुलैमध्ये सरासरीच्या 103% तर ऑगस्टमध्ये 97% पाऊस पडणार - IMD हवामान विभाग

Continues below advertisement
मुंबई : शेतकऱ्यांसह सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो मान्सून अखेर केरळात दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणेच मान्सून केरळात दाखल झाला आहे. राज्यात मान्सून सात ते आठ जून रोजी दाखल हवामान विभागाचा आहे. मात्र, रविवारपासूनच मान्सनपूर्व पावसाने महाराष्ट्राला झोडपायला सुरुवात केली आहे. यावर्षी सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram