Palghar Solar Boat | IIT च्या विद्यार्थ्यांनी बनवली सौरऊर्जेवर चालणारी बोट, 90 हजार रुपयांचा खर्च
पालघरच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कारनंतर आता सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. ही बोट बनवण्यासाठी त्यांना साधारपणे 90 हजार रुपयांचा खर्च आला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही सौरऊर्जेवरची बोट बनवण्यात आली आहे. सदर बोटीतून साधारणता चारशे किलो वजनाची वाहतूक होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. शिवाय या बोटीमुळे प्रदूषण ही होत नसल्याने ही बोट अधिक फायदेशीर आहे.