गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थानहून परतताय? कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तर महाराष्ट्रात नो एन्ट्री
Continues below advertisement
देशात काही रांज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. इतर वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे. या नियमांची आजपासून अमंलबजावणी सुरु होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Delhi Goa Gujarat Covid Death Corona Maharashtra Corona Coronavirus Covid 19