EXCLUSIVE पूर्णत: लॉकडाऊन नाही, मात्र काही कडक नियमांची अंमलबजावणी करणार' - मंत्री विजय वडेट्टीवार
कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. राज्यात लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच स्थानिक प्रशासनाला पूर्ण अधिकार देण्यात आले असून त्यांच्या स्तरावर कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्या त्यांनी कराव्यात, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, असंही ते म्हणाले.