IAF Helicopter Crash Live Updates : हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय...एएनआयनं ही माहिती दिलीय...चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह 14 जणांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं..सीडीएस रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे मोठे अधिकारीही होते..  इकडे नवी दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सीडीएस बिपीन रावत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते..रावत यांच्या नातेवाईकांशी राजनाथ सिंह यांनी चर्चा केली... हेलिकॉप्टर अपघाताबाबत राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देण्याची शक्यता आहे..   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola