IAF Helicopter Crash : भारतीय वायुसेनेचं हेलिकॉप्टर कोसळलं CDS जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर
भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं. या अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे एएनआयच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. DNA अहवालानंतर मृतांची ओळख पटवली जाणार आहे.