औरंगाबादेत माणुसकीचं दर्शन, जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त वृद्धाला केली मदत, मात्र...
Continues below advertisement
औरंगाबादेत अशीच एक माणूसकी दर्शवणारी घटना पहायला मिळाली. घटना शहरातील गजानन नगर भागातील आहे. याच भागात एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. घरातील सगळे लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र घरातील एका 74 वर्षीय वृद्ध व्यक्तीला चालताही येत नसल्याने त्यांना घरातच ठेवण्यात आलं. त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणार मुलगा त्यांची देखभाल करत होता. पण दोन दिवसांत त्यांची तब्येत खूपच बिघडली. आता त्यांना रुग्णल्यात दाखल करुन गरजेचं झालं. रुग्णवाहिका आली. मात्र त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यास कोणीही तयार नव्हते. अनेकांना विनवणी करून कोणीही तयार झाले नाहीत. शेवटी भागात राहणाऱ्या जिल्हा परिषदेत कर्मचारी असलेल्या कृष्णा बोरसे यांनी स्वतः पीपीई किट घातलं. जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यावृद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवले. सोबत त्यांचा मुलगाही होता. पण त्यांना एकट्याला हे शक्य नव्हते, शेवटी बोरसे यांच्या मदतीने त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु झाले, पण दुर्दैवाने त्यांचा काही तासांतच उपचाादरम्यान मृत्यू झाला.
Continues below advertisement