
HSC & JEE Exam Clash | HSC आणि JEE च्या परीक्षा एकाचवेळी, परीक्षा तर जाहीर पण नियोजनाचं काय?
Continues below advertisement
लातूर : JEE परीक्षेच्या तारखा आपल्या बारावी बोर्डाच्या परीक्षांबरोबर क्लॅश होत आहेत. बोर्डाच्या परीक्षेचा तिसरा आणि चौथा टप्पा क्लॅश होत आहे. अभ्यासक्रम संपलेला नसल्यामुळे पहिला आणि दुसरा टप्पा उपयोगाचा नाही. अभ्यासक्रम तोपर्यंत संपत नाही, असं पालकांचं म्हणणं आहे. बोर्डाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांच्या तारखा 12 वी बोर्ड बरोबर क्लॅश होत आहेत. त्यामुळं एप्रिलऐवजी जूनमध्ये बोर्डाच्या परीक्षा घ्या, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
Continues below advertisement