Final Year Exam | परीक्षा होणार, पण परीक्षेचं स्वरुप कसं असणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शिक्षणमंत्र्यांची उत्तरं

अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांचेकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची असणार आहे. अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.

अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु आहे. ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. या तीन पर्यायांपैकी प्रत्येक विद्यापीठ एक पर्याय निवडणार आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे. काल राज्यपालांशी चर्चा झाल्यानंतर आज कुलगुरूंची समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर परीक्षा आयोगाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola