How to use Mahajobs Portal? महाजॉब्स पोर्टलचा वापर कसा करावा? नोकरीचा अर्ज कसा भराल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'महा जॉब्स' पोर्टलचं आज लोकार्पण केलं. राज्यातल्या उद्योगात मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा हे पोर्टल सुरु करण्यामागचा उद्देश आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले "महाजॉब्स" हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमीपुत्रांना  पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर "महाजॉब्स" नावाचे ॲप  उपलब्ध करून देण्याची सुचनाही उद्योग विभागाला केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola