Covid Vaccine | कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला किती डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा नाश करण्यासाठी कोरोना लस रवाना झाली आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे. औपचारिक प्रारंभ आजपासून (मंगळवार) होणार आहे. कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी भारताला आज कोविशिल्डची लस मिळाली आहे. अशा परिस्थितीत कोविशिल्ड लसीची पहिली तुकडी विविध राज्यात पाठवण्यात येत आहे.