Mumbra Corona | हॉटस्पॉट असलेल्या मुंब्रा परिसरानं कोरोनाला कसं रोखलं? स्पेशल रिपोर्ट

मुंब्रा शहरात शुक्रवारी एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तर दहा दिवसांत फक्त 53 बाधित सापडले असून पालिकेच्या वतीने साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्याचा हा परिमाण असल्याचं बोललं जातंय. ठाण्यात कोरोनाबधितांची सुरुवात ज्या मुंब्रा परिसरात झाली आता त्याच मुंब्र्यात रुग्ण संख्येत घट झाली आहे. झोपडपट्टी तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी रस्त्यावरती मुक्तपणे फिरणार्‍या नागरिकांमुळे येथील बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, मात्र मागील दहा दिवसात येथे फक्त 53 नवे कोरोना बाधित आढळून आले असून शुक्रवारी येथे एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मुंब्र्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. या कोरोनामुक्तीमुळे ठाणे शहरातील हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन परिसरातील देखील रुग्ण संख्या कमी झाली पाहिजे असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola