
Special 22 Formula | कोरोनाला ब्रेक लावणारा 22 कलमी मुंबई पॅटर्न, मुंबईच्या फॉर्म्युल्याची दिल्लीपर्यंत चर्चा
Continues below advertisement
देशातलं आणि राज्यातलं कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे मुंबई, एक वेळ अशी होती जेव्हा मुंबईला कोरोनाचा नरक संबोधलं गेलं. मात्र, त्याच मुंबईत कोरोनाचा वेग कमी करण्यात प्रशासनाला आता यश आलंय. या यशामागे आहे मुंबई महापालिका आयुक्तांनी राबवलेली एक गेम चेंजर पॉलिसी, आता मुंबईनं राबवलेला 22 सूत्री धोरणांचा हाच मुंबई पॅटर्न देशभरात लागू करण्याचा सल्ला केंद्रीय पथकानं दिला आहे. मुंबईचं 22 सूत्रं असणारं हे धोरण गेम चेंजर ठरलं आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची 22 सूत्री कार्यक्रमाची पुस्तिका केंद्राला सादर केलीय. सोबतच, मुंबईचा कोरोनानियंत्रणात आणण्यासाठी 22 सूत्री कार्यक्रम देशभरातील हॉटस्पॉटमध्ये राबवण्याचा केंद्रीय पथकाने सल्ला दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Corona Pattern Bmc Commissioner Interview Iqbal Chahl Interview Special 22 Iqbal Chahal BMC Commissioner Bmc