भानुशाली यांचा मृतदेह घाटकोपरहून हाजीआलीजवळ आला कसा? महिला गटारात वाहून गेली की घातपात?

Continues below advertisement

मुंबईच्या घाटकोपरमध्ये उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला आहे. शीतल भानुशाली असं या महिलेचं नाव आहे. हाजीअली समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला.

घाटकोपर परिसरातील असल्फा या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती. दळण आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांनी दुसऱ्या मार्गावरुन जाण्याचा निर्णय घेतला. पण याच दरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या. अखेर त्यांचा मृतदेह हाजीअली किनारी आढळला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram