#KanganaRanaut मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राकडून वाय प्लस सुरक्षा देणं आश्चर्यकारक - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहे.
Tags :
Kangana In Mumbai Kangna On Mumbai Kangana Ranot Kangna Y+ Security Mumbaikar Kangna Ranaut Anil Deshmukh Aamchi Mumbai Kangana Ranaut Amit Shah