Santosh Banger Hingoli : शक्तिप्रदर्शन अंगलट, तलवार बाहेर काढून फिरवल्यानं बांगरांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत काल आमदार संतोष बांगर यांनी भव्य कावड यात्रा काढली होती. या यात्रेला मोठ्याप्रमाणात गर्दीही झाली होती. या यात्रेमध्ये आमदार बांगर यांना एक तलवार कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. यावेळी त्यांनी तलवार म्यानातून काढली आणि दाखवली. त्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, याप्रकरणी आता त्यांच्यावर कळमनुरी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच बेकायदेशीररित्या स्पीकर वाजवल्यानं स्पीकर मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola