Hingoli Firing : सेवानिवृत्त जवानाचा हिंगोलीत हौदोस, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हयरल
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेवानिवृत्त जवानाने वाढदिवसाच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. साहेबराव रणवीर असं या सेवानिवृत्त जवानाचं नाव आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये नाचत असताना या जवानाने चक्क एका इसमाच्या डोक्याला बंदूक लावली त्या नंतर हवेत दोन राऊंड फायर केले असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आलंय. तर याच जवानाने काल एका हॉटेलमध्ये गोळीबार केला होता. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून संबंधित सेवानिवृत्त जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Tags :
Birthday Gun Video Viral Hingoli Case Registered Retired Soldier Firing In The Air Firing In Hotel Police In Custody