Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळ

Continues below advertisement

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळ

पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये (Mahayuti) रस्सीखेच पाहायला मिळत असताना हिंगोलीचे पालकमंत्री सुद्धा यात मागे नाहीत. वसमतमध्ये आमदार राजू नवघरे (Raju Navghare) यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. यात नरहरी झिरवाळ यांनी माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या (Hingoli News) गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले, याचा वरिष्ठांना जाब विचारणार असे मिश्कील वक्तव्य केले आहे. नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 

राज्य सरकारकडून मागील आठवड्यात रविवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. कारण नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि रायगडमध्ये अदिती तटकरे यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या समर्थकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. तसेच पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील दरे गावात निघून गेल्याची चर्चा रंगली होती. तर दुसरीकडे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram