Hingoli Water Issue : भर उन्हात पाण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत ABP Majha

Continues below advertisement

हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. मागणी असूनही अनेक गावांमध्ये नियमांचा दाखला देत प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना तासनतास विहिरीवर उभे राहून पाणी भरावे लागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील लक्ष्मण नाईक तांडा या गावातील सुद्धा परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. गावालगत असलेल्या 30 फूट खोल विहिरीत दुरून आणलेलं पाणी मोटर पाईपलाईनच्या साह्याने सोडलं जातं आठ ते पंधरा दिवसानंतर विहिरीत सोडलेलं हे पाणी घेण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांची या विहिरीवर गर्दी होत असते. गावातील पाणीटंचाईमुळे 50% होऊन अधिक नागरिकांच स्थलांतर झालं आहे.  तर गावामध्ये पाणी नसल्यामुळे गावातील मुलांची लग्न राहिले आहेत गावात कोणी मुली देत नाही तर गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली जनावर सुद्धा विकली आहेत अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे त्यांच्यासोबत बातचीत केली आहे. आमच्या प्रतिनिधींनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram