Hingoli Santosh Bangar : ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर यांचे शक्तिप्रदर्शन : ABP Majha
उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेनंतर शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कावडयात्रेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. यावेळी मला मिळालेल्या बेंडकुळ्या या मायबाप जनतेचे आशीर्वाद आहेत, असं म्हणत आमदार बांगर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. दरम्यान, हिंगोलीतून काढलेल्या भव्य कावडयात्रेत भाविकांचा प्रचंड सहभाग होता.