Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

Continues below advertisement

मराठवाडा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना मध्यरात्री सलग चार वेळा भूकंपाचे धक्के बसले. सर्वात मोठ्या धक्क्याची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्री दोन तासांमध्ये चार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत 4.6 रिस्टर स्केल हा भूकंप  सर्वात जास्त तीव्र समजला जात आहे या भूकंपाचे सर्वात जास्त हादरे तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बसले आहेत परिणामी अनेकांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तर काहींच्या घरांना तडे गेले आहेत आमदरी येथील रहिवासी असलेल्या नत्थु बेले यांचे घर पडले आहे त्यामुळे घरातील सर्व संसार उघड्यावर पडला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola